Govind Giri Maharaj Speak At Ram Mandir Ayodhya :- आयोध्या मध्ये राम जन्मभूमी येथे राम लल्लांचे प्राणप्रतिष्ठा झाल्यावर बरेच जणांनी आपल्या आपली मत व्यक्त केले सोबत गोविंदगिरी महाराज सुद्धा आपले मत व्यक्त केले होते त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्याशी मिळता जुळता एक वक्तव्य केले होते त्यामुळे खूप लोक चिंतेत आणि वेगवेगळे अर्थ काढत आहेत नेमकं काय आहे तो प्रकार आणि काय बोलले होते गोविंदगिरी महाराज. आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
गोविंद गिरी महाराज नेमकं काय म्हणाले :-
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही सांगितलं होतं की तीन दिवस उपवास करा परंतु त्यांनी अकरा दिवसाचा उपवास केला अकरा दिवस अधिष्ठान म्हणून जमिनीवर झोपण्याचा उल्लेख करत त्यांच्या तपस्येचा कौतुक केले. कौतुक करताना पुढे गोविंद गिरी महाराज म्हणतात आम्ही तुम्हाला तीन दिवस जमिनीवर झोपण्यास सांगितले होते तुम्ही या कडकडच्या थंडीमध्ये अकरा दिवसापासून जमिनीवर झोपतात मित्रांनो ब्रह्माने सृष्टीला निर्माण केलं होतं तेव्हा त्यांनी एक शब्द ऐकला होता तो भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा शब्द आहे… तप तप इती!!
आमच्या गुरूंचे गुरु परगुरु परमाचार्यजी महाराज करायचे अशे तपश्चर्य. आज तपांची कमी होत चालली आहे. आम्ही आज तुमचा तप पाहिला ही परंपरा पाहताना आम्हाला केवळ एक महाराजा आठवतो यामध्ये हे सर्व काही होतं त्या राजाचं नाव ‘ ‘छत्रपती शिवाजी महाराज होते, असे गोविंदगिरी महाराज म्हणतात.
छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना.
गोविंद गिरी महाराज पुढे म्हणतात लोकांना कदाचित ठाऊक नाही जेव्हा ते मल्लिकार्जुन चे दर्शनासाठी श्रीशैलम वर गेले तेव्हा तीन दिवसाचा उपवास केला. तीन दिवस शिव मंदिरात राहिले महाराजांनी म्हटले होते. मला राज्य नाही करायचा मला संन्यास घ्यायचा आहे. मी शिवांच्या तपश्चर्यासाठी जन्मलो आहे. मला संन्यास घ्यायचा आहे. मला परत येऊ नका त्यांच्या सर्व श्रेष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं आणि परत घेऊन आले, की हे सुद्धा तुमचंच कार्य आहे. आज आपल्याला तसेच प्रकारचे महापुरुष प्राप्त झाले आहेत. ज्यांना माता जगदंबेने हिमालयातून ‘जा भारत मातेची सेवा कर’ म्हणत परत पाठवला आहे. तुम्हाला भारत मातेचे सेवा करायचे आहे. असे गोविंदगिरि महाराज म्हणाले पुढे सांगतात “मी स्वतःला श्रीदेवीच्या बाबतीत कधी भाऊ होत नाही मात्र काही ठिकाणी अशीच असतात आपोआप आपण नतमस्तक होतो” असे एक स्थान उच्च पदस्थ राजेश्रीने दाखवलं तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी रामदास महाराजांची आठवण आली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन केलं ” निश्चयांचा महामेरू || बहुत जनासी आधारू || अखंड स्थितीचा निर्धारू || श्रीमंत योगी…” आपल्याला आज एक श्रीमंतयोगी प्राप्त झाला. असं गोविंदगिरी महाराज म्हणाले….
नेटकरी चुकीचा अर्थ का काढत आहेत..:
कोणीतरी हे बोललेलंच आहे की जेव्हा सत्य चप्पल घालतो तेव्हा खोटं गावभर फिरून येतो तसेच या ठिकाणी काहीतरी घडलेलं आहे काही लोक असे आहेत जे गोविंदगिरी महाराजांचा संपूर्ण भाषण ऐकले नाही आणि छोटसं क्लिप ऐकून स्वतःचे मत व्यक्त केले ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचे तुलना तुम्ही नरेंद्र मोदींची कसे करू शकता. आणि लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आपल्या मत व्यक्त करत आहेत.
मग काय खरं आहे….:
या पोस्टच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं तुलना नरेंद्र मोदींशी होत नाहीये. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा उपवास केले, त्याच प्रकारे उपवास आणि तप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा केले होते फक्त एक उदाहरण म्हणून किंवा अशा प्रकारचा तप छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये सुद्धा होता हे फक्त सांगण्याचा प्रयत्न केले होते गोविंदगिरी महाराज.