काय! जॉब सोबत बिझनेस करताय… आत्ताच थांबा नाहीतर….

काय! जॉब सोबत बिझनेस करताय… आत्ताच थांबा नाहीतर….

Side business with current job: आपल्याला शाळेमध्ये, समाजामध्ये, सोसायटीमध्ये हेच शिकवलं जातं की, शाळेत चांगला मार्क घ्यायचा, चांगला शिक्षण घ्यायचं आणि पुढे कुठेतरी चांगलं नोकरी करायचं. जेव्हा आपण अशा प्रकारे काम करतो किंवा नोकरी करतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट की जे आपले स्वप्न आहेत तर ते नोकरीमध्ये पूर्ण होत नाहीत. तर तिथे फक्त गरजा पूर्ण होतात तर हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे आपल्याला वाटतं आपण एक उद्योग करायला पाहिजे. परंतु सिच्युएशन अशी असते की आपण आहे ती नोकरी सोडू शकत नाही आणि बिझनेस करणं हे पण सोडू शकत नाही. त्यामुळे आपल्या वरती जबाबदारी असतात आणि नोकरी करणे गरजेचे असतो. म्हणून काहीजण नोकरी सोबत बिझनेस सुद्धा करतात. तर तुम्ही या गोष्टी करत असाल तर नक्की आजच्या आज थांबवा.
तर कोणत्या आहेत अशा गोष्टी तर त्या पोस्टमध्येp पूर्ण सर्व माहिती दिली आहे तर हा पोस्ट पूर्ण वाचा.

1) तुम्ही रोज बारा ते पंधरा तास काम करण्याची तयारी पाहिजे.

जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की जॉब हे फक्त आठ ते नऊ तासाचा असतो त्यामध्ये आपण चार ते पाच तास हे मन लावून काम करतो बाकीचे दोन तीन तास हे निवड टाईमपास असतात. परंतु जर का तुम्हाला उद्योग क्षेत्रात यायचं असेल बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी बारा ते पंधरा तास काम करण्याची शरीराला तयारी करावी लागेल तेव्हाच तुम्ही पुढे जाऊन उद्योगात यशस्वी होऊ शकता.

2) बिझनेस मध्ये येणाऱ्या कोणत्याही समाजाचा सामना करण्याची तयारी पाहिजे

आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथं आपल्याकडून काही चूक झाली असेल किंवा एखादी नको असलेले जबाबदारी आली असेल तर ते दुसऱ्या वरती ढकलतो किंवा समस्या जरी आली असेल तेव्हा आपण सर्रास कंपनीवर ढकलून देतो जे काय बघायचं ते कंपनी बघून घेईल असे म्हणून आपण त्या ठिकाणी समस्या टाळतो परंतु बिझनेस मध्ये असं चालत नाही तिथे तुम्हाला स्वतःलाच सर्व गोष्टी मॅनेज करावे लागतील आणि समस्या छोट्या किंवा मोठ्या काहीही असू शकतात ते सांभाळण्याची तयारी तुमच्यात पाहिजे तरच तुम्ही बिझनेस मध्ये चांगला पैसा कमवू शकता.

3) तुमच्याकडे साईड बिजनेस ला मेन बिझनेस बनवण्याचे स्किल पाहिजे.

काही वेळेस काय होतं आपण नोकरीमध्ये तर खुश असतो परंतु आणखीन पैसे कमवण्यासाठी बिजनेस मध्ये उतरतो आणि पूर्णपणे फोकस कुठे करायचा हा आपल्याकडे महत्त्वाचे माहिती नसतो. म्हणून बरेच जणांचा असं नुकसान झालंय बिजनेस मध्ये अर्धवेळ देऊन नोकरीमध्ये नुकसान होतं आणि धड बिझनेसही होत नाही आणि नोकरीही पूर्ण होत नाही अशा वेळेस तुमच्याकडे हा उद्देश खूप असणे गरजेचे आहे की, जो तुम्ही साईड बिजनेस चालू करणार आहात ते त्याला मेन बिजनेस बनवण्याची कॅपॅसिटी, स्किल्स तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही कोणत्या उद्देशाने बिजनेस चालू करताय हा खूप महत्त्वाचा आहे. फक्त एक्स्ट्रा इन्कम म्हणून जर का तुम्ही बिझनेस चालू करत असाल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी आहे तो जॉब सोडून मेन बिझनेस कशाप्रकारे बनवता येईल किंवा कशाप्रकारे उत्पन्न त्यामधून काढता येईल हे उद्देश असणे गरजेचे आहे.

4) जॉब कधी सोडावा.

आता बरेच जणांच्या डोक्यामध्ये असतो की आता मी बिझनेस चालू केला त्यामधून मला उत्पन्न तर मिळतोय मी आता जॉब सोडणार आणि पूर्ण वेळ बिजनेस साठी देणार. असं करत असेल तर आत्ताच थांबा… कारण समजा, जर का तुमचे उत्पन्न 50 हजार रुपये महिना असेल आणि तुम्ही तुमच्या बिजनेस मधून 20 हजार रुपये कमवताय तर तुम्हाला आत्ताच जॉब सोडायची गरज नाही. जेव्हा तुमच्या बिझनेस मधून कमीत कमी 50 हजार रुपये प्रति महिना उत्पन्न होत असेल, तेव्हाच तुम्ही जॉब सोडावा कारण 50 हजार रुपयाचा जो काही तुमचा खर्च आहे ऑलरेडी डिझाईन झालेला असतो. त्यामुळे कमीत कमी तुमच्या पगारा इतपत किंवा त्यापेक्षा जास्त बिझनेस मधून येत असेल तर आहे तो जॉब सोडा तोपर्यंत सोडू नका.

5) तुमच्याकडे सहा महिन्याचे इमर्जन्सी फंड पाहिजे.

आता समजा तुमच्या जॉब पेक्षा तुमचं बिजनेस मधून उत्पन्न पगारापेक्षा जास्त होतोय आणि तुम्ही जॉब सोडला तर तुम्हाला एक गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे ते म्हणजे की पुढील सहा महिन्यापर्यंतचा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे लिक्विड मध्ये पाहिजे. जसं की समजा तुमचं वैयक्तिक खर्च, घरचा पूर्णपणे मेंटेनन्स सर्व गोष्टी 30 हजार रुपये मध्ये मॅनेज होत असेल तर पुढील सहा महिन्यापर्यंतचा लिक्विड फंड तुमच्याकडे पाहिजे. त्याला इमर्जन्सी फंड म्हणतात.

6) तुम्ही मानसिक दृष्ट्या तयारी रहा :

जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला आहे की, आपण नोकरी करत असताना कोणाच्या तरी जबाबदारीच्या खाली आपण काम करतो. म्हणजे काही प्रॉब्लेम आला नुकसान झालं तर कंपनीचा होईल म्हणून आपण विचार करतो. आणि रिलॅक्स होतो. परंतु बिझनेस मध्ये चढउतार येत असतात, समस्या छोटी किंवा मोठी असू शकतात. या सर्व गोष्टी समस्या हाताळण्यासाठी तुम्ही मानसिक दृष्ट्या तयारी केली पाहिजे. कारण, यामध्ये तुमचं सर्वात मोठा शत्रू आहे, तो तुमचा मानसिक विचार आहे. जसा तुम्ही विचार करताय तसं तुम्ही बनत राहता. जर तुम्ही बिझनेस मध्ये लॉज झाला आणि विचार करू लागल्यात हे बिझनेस माझ्यासाठी नाहीये नोकरी केलेलाच बर आहे फिक्स पगार तरी येतो तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. कारण बिजनेस मध्ये जेव्हा लॉस होतो तेव्हा तो तुमचा वाईट काळ असतो आणि जर का तुम्ही ती परिस्थिती हाताळलात तर तुम्ही येणाऱ्या सुवर्ण काळाचे हकदार असता.

तर अशाप्रकारे मित्रांनो जॉब सोबत साईड बिजनेस करत असाल आणि जॉब सोडून बिजनेस करत असाल तर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळला तर नक्की यशस्वी उद्योजक व्हाल आणि तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण कराल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *