Virat Kohli’s sixes have been included in the ICC T-20 World Cup promo video :
मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्डकप मध्ये ऑस्ट्रेलियाने कप जिंकला होता आणि भारताचा हार झाला होता अजूनही काहीजण त्या दुखातून बाहेर येणं अवघड झालंय. आता आनंदाची बातमी अशी आहे ती लवकरच T-20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे आणि त्याच तयारी जोरात सुरू झाली आहे. ICC ने वेळापत्रक हे पूर्णपणे तयार केले आहे आणि सेमी फायनल ची तारीख मध्ये बदल करून तिकीट विक्रीची घोषणा केली आहे. त्याच दरम्यान t20 वर्ल्ड कप चा प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे. त्यामध्ये विराट कोहली चा फेवरेट शॉट समावेश केला आहे. विराट कोहली जेव्हा मेलबर्न मध्ये मॅच खेळत होते हरिस रौफ विरुद्ध मारलेला तो षटकार दाखवण्यात आला आहे.
Table of Contents
कोणत्या match मधला तो six आहे:-
खरंतर 2022 च्या टी ट्वेंटी विश्वचषका दरम्यान भारतीय संघाचा पहिला सामना हे पाकिस्तान विरुद्ध होतं. त्या सामन्यामध्ये पाकिस्तानी संघ खूप चांगल्या स्थितीत होते. टीम इंडियाच्या चार विकेट खूप लवकर पडल्या होत्या परंतु त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने जबरदस्त भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले आणि टीम इंडियाला विजयापर्यंत पोहोचवले.
हरिस रौफविरुद्ध विराट कोहलीने दोन जबरदस्त षटकार ठोकले होते –
जर का तुम्ही तो मॅच पाहिला असेल तर माहिती असेल तुम्हाला की भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या दोन ओवरमध्ये 31 धावांची गरज होती अशा स्थितीमध्ये 19 व्या ओवरमध्ये गोलंदाजी करायला आलेला हरीस रौफने पहिले चार चेंडूत चांगले टाकले होते लोकांना घाम सुटू लागला होता. लोकांचा धक धक वाढू लागला आणि विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूवर मोठे शॉर्ट हवे होते. एकीकडे लोकांना खूप भयंकर टेन्शन येत होता दुसरीकडे आनंदही होता कारण बॅट विराट कोहलीच्या हातात होता अशा स्थितीमध्ये विराट कोहलीने दोन जबरदस्त षटकार ठोकले यातील पहिल्या षटकार जो खूप शानदार होता ज्याचे सर्वांनीच कौतुक केले. आणि इंडिया टीम विजय झाली. विराट कोहलीने शेवटी ज्याप्रकारे षटकार मारले ती स्टाईलची खूप दिवस चर्चा चालली होती आता आयसीसी ने येणाऱ्या वर्ल्ड कपच्या प्रोमो मध्येही त्याचा समावेश केला आहे ज्याचा व्हिडिओ एक्स वर म्हणजेच ट्विटर वर शेअर करण्यात आला आहे.
कसा असेल टी 20 world cup match आढावा :
येणाऱ्या टू ट्वेंटी वर्ल्ड कप दरम्यान भारतीय संघाचे सर्व गट सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं भारत पाकिस्तान सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. आयसीसी ने टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी तिकीट ची प्रोसेस जाहीर केली आहे. 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान तिकिटासाठी अर्ज करावा लागणार आहे. Icc च्या वेबसाईटवर प्रवेश केल्यानंतर फॅन्स सहा तिकिटांसाठी अर्ज करू शकतात.
Virat Kohli बद्दल संक्षिप्त माहिती :-
विराट कोहली हा एक अत्यंत कुशल भारतीय क्रिकेटपटू आहे, जो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत जन्मलेला कोहली हा खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट धावा करणारा खेळाडू आहे. तो त्याच्या आक्रमक खेळाची शैली, अपवादात्मक फिटनेस आणि मजबूत नेतृत्व कौशल्यासाठी ओळखला जातो.
कोहलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम आणि टप्पे गाठले आहेत. तो सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार राहिला आहे आणि त्याने संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या सातत्य आणि दृढनिश्चयासाठी ओळखल्या जाणाऱ्या, कोहलीने केवळ त्याच्या क्रिकेटच्या पराक्रमासाठीच नव्हे तर तंदुरुस्ती आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी त्याच्या वचनबद्धतेसाठी देखील प्रशंसा मिळविली आहे.
मैदानाबाहेर विराट कोहली विविध परोपकारी कार्यात गुंतलेला असतो आणि तो युवा आयकॉन मानला जातो. खेळाबद्दलची त्याची आवड, तीव्र स्पर्धात्मकता आणि समर्पण यामुळे त्याला समकालीन काळात एक क्रिकेट लीजेंड बनले आहे