सध्या आयोध्या मध्ये रामनामाचे झेंडे फडकत आहेत रस्त्यावरून जय श्रीराम चा जयघोष करत, हाती धनुष्य असलेला प्रभू श्रीरामांचे LED फोटो मुख्य मार्गावर लावलेल्या मोठ्या मूर्ती आणि लाइटिंग चा झगमगाठ असलेल्या घाटांवरून सुरू असलेले राम मय वातावरण आणि रस्त्यावर टाकला जाणारा डांबर अशाच प्रकारचे काम होताना दिसत आहेत आणि राम मंदिराकडे जाणार प्रत्येक रस्त्यावर काम होत आहेत अनेक किलोमीटर लांबीचे रस्ते एकाच रंगात रंगून गेले आहेत.
आपल्या सर्वांना माहित आहे की 22 जानेवारीला राम मंदिरात रामलालांचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी संपूर्ण अयोध्याला सजवण्यात येत आहे त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे सर्विस विभाग दिवस-रात्र त्या गोष्टीची तयारी करत आहेत.
नोव्हेंबर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णयाने बाबरी मज्जिद आणि राम मंदिराचा वाद संपला आणि राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला.
या निर्णयानंतर अयोध्या मध्ये प्रॉपर्टी चा रेट वाढेल असा सर्वांचाच अंदाज होता, परंतु अशाप्रकारे एवढा प्रमाणात त प्रचंड दर वाढेल असं कोणालाही वाटलं नव्हतं
सध्या प्रॉपर्टी चे रेट काय आहेत ?
आयोध्यातील बिजनेस आणि प्रॉपर्टी डीलर राजकुमार गुप्ता सांगतात की आयोध्या मध्ये आता प्रॉपर्टी चे रेट चे काही सीमा राहिलेले नाही, कारण जेव्हा नदीला भरती-ओहोटी येते तेव्हा नदीचा वेग कोणीही अंदाज लावू शकत नाही सध्या या क्षेत्रामध्ये अशीच भरती ओहोटी सुरू आहे कोणताही मालमत्ता किंवा प्रॉपर्टी किंवा जमीन कितीही दराने विकली जाईल यावर काहीही आश्चर्य वाटण्यासारखं नाही.
अयोध्यातील रियल इस्टेट कन्सल्टंट अमित सिंग सांगतात की राम मंदिराच्या आसपासचा परिसराला प्राधिकरणाने धार्मिक परिसर म्हणून जाहीर केला आहे. या ठिकाणी चार वर्षांपूर्वी जी जागा दोन हजार रुपये चौरस फूट या दराने मिळत होती ती आता पंधरा हजार दराने मिळत नाही.पुढे सांगतात लखनऊ गोरखपुर हायवे वरून एक रस्ता जातो नव्या घाटाकडे येथून राम मंदिर जवळ आहे या ठिकाणी अगोदर पाच हजार चौरस फुटाचा एक कमर्शियल प्रॉपर्टी चा रेट 2019 मध्ये 4500 रुपये प्रति चौरस फूट म्हणजे 2 कोटी 25 लाख असल्याचा अंदाज लावला गेला होता. 2020 मध्ये हा वाढून 3 कोटी झाला असून आता त्या भागातील ज्या व्यक्तीकडे जमीन आहे तो आता 5 कोटींमध्येही त्याची विक्री करायला तयार नाही असे ते म्हणाले.
का वाढत आहे प्रॉपर्टी चे रेट ?
जेव्हापासून राम जन्मभूमीवर राम मंदिराची निर्मिती सुरू झाली ना तेव्हापासून अयोध्यामध्ये मोठमोठ्या सरकारी योजनांमध्ये कामांना सुरुवात झाली.
आयोध्या शहरातील व्यवसायिक आणि व्यापार अधिकार मंच संयोजक सुशील जयस्वाल हे सांगतात मंदिराचे काम सुरू होतात सरकारने रोड एअरपोर्ट रेल्वे स्टेशन रुग्णालय रुंद रस्त्यांपासून ते ड्रेनेज लाईन पर्यंत वेगाने कामाची सुरुवात झाली आहे.
त्याशिवाय अयोध्या मध्ये मोठमोठ्या रिअल इस्टेट कंपनी आहे इन्व्हेस्ट करत आहेत. त्याशिवाय मुंबईतील लोढा ग्रुप ताज ग्रुप हैदराबाद ग्रुप तिरुपती बालाजी ग्रुप हे हॉटेल आणि टाऊनशिप मध्ये गुंतवणूक करत आहेत.
तुमच्या माहितीसाठी सांगतो मंदिरापासून अंदाजे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या जमिनीवर मुंबईच्या लोढा ग्रुपने 25 एकर जमिनी खरेदी केली आहे त्या ठिकाणी ते प्लोटिंग करत आहेत. या टाऊनशिपमध्ये एका चौरस फुटाचा रेट 15700/- रुपये आहे आणि या कंपनीने 1270 चौरस फूट आकारातील प्लॉट पासून सुरुवात केली असून त्याचे अंदाजे किंमत एक कोटी 80 लाख रुपये आहे.
अयोध्येत जमिनी घेणं शक्य आहे का ?
अयोध्यामध्ये मध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या मते शहरांमध्ये दीडशे पेक्षा जास्त मोठ्या कंपन्यांनी बसताना मांडलाय आणि या कंपन्यांचे विशेष म्हणजे हॉटेल आणि रिअल इस्टेट उद्योगाचे रिलेटेड आहे.
लोकल प्रॉपर्टी डीलर राजू गुप्ता हे म्हणतात ह्या कंपन्या कोणत्याही भावामध्ये प्रॉपर्टी जमिनी खरेदी करत आहेत त्यामुळे रोज नवीन विक्रम रचले जात आहे परिणामी आता जमिनीशी शिल्लक राहिलेली नाहीये.
आयोध्या मध्ये राहणाऱ्या काजल गुप्ता यांच्याकडे राम मंदिरापासून सहा किलोमीटर अंतरावरती 2014 ची एक कमर्शियल प्रॉपर्टी होती ती त्यांनी 2021 मध्ये 65 लाखांमध्ये विकली होती ते म्हणतात राम मंदिर तयार झाल्यानंतर प्रॉपर्टी चे रेट एवढे वाढतील असा मला वाटलं नव्हतं आम्ही त्यावेळी बाजारातील दरानुसार जमिनी विकली होती पण दोन वर्षांमध्येच त्याची किंमत दीड कोटीच्या वर गेली आहे आम्ही थोडी वाट पाहायला हवी होती याचा आम्हाला आज पश्चाताप होतोय असं त्या म्हणाल्या.
पण हे काय आयोध्यातील एका व्यक्तीची कहाणी नाहीये सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी जमिनी विकल्या त्या सर्वजण आज पश्चाताप होत आहेत कारण त्या जमिनीची किंमत आज लाखांमध्ये नाही तर कोटींमध्ये आहे.
एका सर्वे च्या रिपोर्टनुसार सध्या आयोध्या मध्ये रोज सुमारे सात हजार लोक राम मंदिरात दर्शनासाठी येतात आगामी काळामध्ये हा आकडा काही लाखांवर सुद्धा जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये या धार्मिक शहरांमध्ये प्रॉपर्टी चे रेट कुठपर्यंत जातील याचा अंदाजही लावणं कठीण आहे.