how to get rid of digital secure :-
जर तुमच्या पैशावर आणि स्वतःवर काय जे असेल तर हे पोस्ट तुमच्यासाठी आहे. how to avoid digital scam आजच्या पोस्टमध्ये कोणत्या गोष्टी केल्याने आपला पैसा वाचवू शकतो चला तर जाणून घेऊया.
1 ) OLX वर खरेदी विक्री करणे टाळावे कारण त्यामध्ये फसवणूक जास्त प्रमाणात होतात.
2) कोणीही गुगलवर बँक कस्टमर केअर, हेल्पलाइन नंबर शोधू नये.
3) जर तुम्ही ऑनलाईन वरून लोन घेत असाल तर लगेचच थांबा आणि घेऊ नका कारण त्यांचा पर्सेंटेज खूप हाय असतो आणि त्याच्याने तुमच्या आणखीन नुकसान होऊ शकतो.
4) एखादी अनोळखी व्यक्ती व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करत असेल तर उचलू नका.
5) जर तुम्हाला असा मेसेज येत असेल की जर तुम्ही बिल नाही भरला तर आज संध्याकाळी लाईट कट होईल. तर अशा फसव्यागिरीवर भरोसा ठेवू नका.
6) खास करून लोक फेसबुक वरती जास्त शेअर करत असतात आपलं पर्सनल डेटा तर असा अजिबात करायला जाऊ नका. फेसबुकचा प्रोफाईल फोटो लॉक करा आणि जो तुम्ही पर्सनल फोटो शेअर करणार आहेत ते फक्त तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना दिसावा असे सेटिंग करा.
7) आपले डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांचे पासवर्ड डायरीमध्ये लिहून ठेवावे मोबाईल मध्ये सेव करू नका कारण एखादा ॲप हॅक झाला तर तुमचा डेटा सुद्धा हॅक होऊ शकतो.
8) बेटिंग अँप वर पैसा टाकून गेम खेळायला अजिबात जाऊ नका. एकदा सवय लागले की तुमचा पूर्ण बँक बॅलन्स संपू शकतो.
9) सध्या इलेक्शनचे वातावरण आहे त्यामुळे राजकीय पोस्ट कोणासोबतही शेअर करू नका. तुम्हाला माहीत नाही समोरचा कोणत्या पार्टीशी एकजूट आहे.
10) कोणत्याही परिस्थितीमध्ये स्क्रीन शेअरिंग ॲप डाऊनलोड करू नका.
11) तुमच्या सोबत जर का ऑनलाईन फोड झाल्यास बँकेच्या कॉल सेंटर क्रमांक वर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान 1930 या क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी. आणि WWW. cybercrime.gov.in मेल पाठवावा.
12) कोणीही बँकेतून बोलत असेल तर विश्वास ठेवू नये. आपली डेबिट कार्ड क्रेडिट कार्डची KYC माहिती देऊ नये स्वतः बँकेत जाऊन संपर्क साधावा.
13) कोणत्याही परिस्थितीमध्ये JIO, AIRTEL आणि VODAFONE या सिम कार्ड कंपन्यांचे KYC ऑनलाईन करू नये, प्रत्यक्षात जाऊन करावे.
14) अश्लील लिंक, अनोळखी लिंक ओपन करू नये.
15) कोणत्याही ॲप ला allow करू नये, deny करावे.
16) ऑनलाइन डिलिव्हरी ॲप बघु नये, तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वर आपली माहिती सेव करून ठेवू नये, ऑर्डर देत असताना कॅश ऑन डिलिव्हरी करावे.
17) प्रत्येक ठिकाणी एक सारखा आणि सोपा पासवर्ड ठेवू नये, आणि जो पासवर्ड ठेवताय तो पासवर्ड घरी लिहून ठेवावे आणि दर तीन महिन्यात तो पासवर्ड चेंज करावा.
18) तुमचा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड पिन कार्ड च्या मागे लिहून ठेवू नये. तसेच मागील तीन अंकी CVV नंबर झाकून टाकावे.
19) बऱ्याच क्रेडिट कार्डला TAP TO PAY च ऑप्शन ENABLE असतो तर तो ऑफ करून ठेवावा. कारण कोणत्याही मशीनला कार्ड झाला दोन हजार रुपये बँकेतून कट होतात.
20) एटीएम मधून पैसे काढताना स्वाईप मशीन कडे नीट लक्ष द्यावे आणि पासवर्ड कोणालाही न दिसता एंटर करावा.
21) कोणत्याही अनोळखी लिंक ओपन करून आपले ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर एंटर करू नये.
22) जर तुमच्या मोबाईल मध्ये असा एप्लीकेशन असेल त्याचा वापर मागील सहा महिन्यापासून नाही झाला तर तो ॲप UNINSTALL करून टाका.
23) न्युज पेपर मध्ये घरबसल्या कामाचे जाहीरतीवर विश्वास ठेवू नका ते सर्व फसवणुकीचे असतात. काम हवे असल्यास स्वतः त्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी.
24) काहीजण मुद्दामून तुमच्या बँकेत पैसा ट्रान्सफर करतात आणि तुम्हाला पैसे रिटर्न पाठवण्यास सांगतात. तेव्हा तुम्ही त्यांच्या ओळखपत्र आणि बँक अकाउंट विचारूनच पैसे ट्रान्सफर करावे शक्य झाल्यास तुम्ही प्रत्यक्षात भेटूनच ट्रान्सफर करावा.
25) UPI ॲप मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होतंय त्यामुळे थर्ड पार्टी UPI ॲप्स जसे गुगल पे, फोन पे, पेटीएम वापरण्यापेक्षा फक्त आपल्या बँकेचे QR कोड वापरूनच पैसे ट्रान्सफर किंवा घ्यावे.
26) मोबाईल मध्ये घरातील फोटो, व्हिडिओ ठेवु नये, ते सर्व पेन ड्राईव्ह मध्ये ट्रान्स्फर करावे, मोबाईल मध्ये आपले महत्वाचे पासवर्ड, डॉक्युमेंट काहीच ठेवु नये.*
27) फेसबुक,इंस्टाग्राम वरील आपले प्रोफाईल एडिट करून only friend करावे, public, friends of friend करू नये.
तर अशाप्रकारे तुम्ही स्वतःची आणि पैशांची काळजी घेतला तर नुकसान होणार नाही.
आणि मित्रांनो जर तुम्हाला वाचायची सवय आणि आवड असेल तर तुम्हाला मी काही ई-बुक्स recomend करतो. जर तुम्ही ह्या लिंक वर गेलात तर तुम्हाला काही बेस्ट सेलर ई-बुक्स पाहायला मिळतील. तेही अगदी वाजवी किमतीमध्ये, जर तुम्हाला वाचायची सवय असेल तर तुम्ही एकदा चेक आउट नक्की करू शकता.