भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? longest river in india

भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? longest river in india

आपण शाळेत असताना इतिहासामध्ये भारतातील सर्वात मोठी नदी longest river in india कोणती आहे ते अभ्यास केलेला आहे. तरीसुद्धा काही महत्त्वाचे असे मुद्दे आहेत जे तुम्हाला मला या पोस्टच्या माध्यमातून सांगायचं आहे.
The Top Longest Rivers in India

1) सिंधू नदी :- ( Indus River )


सिंधू सगळ्यात लांब आहे. पण “भारतातून” किती वाहते?


सिंधू नदी “हिमालयाच्या पलिकडे” मानस सरोवराच्या आसपास उगम पावते. तिबेटमधून (म्हणजे चीनमधून) पुढे ती लद्दाखमध्ये भारतात शिरते. लेहच्या जवळून वहात वहात ती पुढे “गिलगित-बल्तिस्तान”मध्ये शिरते. (हा भाग भारताचा, पण पाकिस्तानव्याप्त. आपल्यादृष्टीने तोसुद्धा “लद्दाख केंद्रशासित प्रदेशाचाच” एक भाग!) नंतर सिंधू नदी पाकिस्तानात शिरते आणि पाकिस्तानाची जीवनदायी बनते. सिंधू नदीच्या पाच उपनद्या आहेत त्याला पंजाबच्या पाच नद्या सुद्धा म्हणतात. झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास.

वेदकाळातल्या सप्तसिंधूंमधली सगळ्यात महत्त्वाची नदी सिंधूच! खरं तर वेदांची निर्मिती याच परिसरात झाली असं म्हटलं जातं. (आता कुणी म्हणेल की वेद अपौरुषेय आहेत, त्यांची निर्मिती झाली नाही. मग कुणी आर्य-अनार्य याची चर्चा सुरू करेल. आपण त्यात पडूया नको!) एक मात्र खरं की वेदकालीन वाङ्मयात सिंधू नदीचा उल्लेख बराच येतो. हिंदू हा शब्दच मुळी सिंधू नदीवरून आलाय!


2) गंगा नदी :- ( Ganga River )


गंगेबद्दल काही सांगायची गरज आहे का? अर्ध्या भारताची लोकसंख्या तिच्यावर अवलंबून आहे.
हिमालयाच्या पर्वत रांगेत हिमनदीत गंगा उगम पावते आणि ही खलखळणारी नदी उत्तर भारताच्या मैदानामध्ये आली की संथ वाहू लागते. यमुना, गंडकी, कोसी अशा उपनद्या तिला येऊन मिळतात. हिमनद्यांवर पोसलेल्या या नद्यांमुळे वर्षभर गच्च भरून वाहणारी गंगा नदी अख्ख्या उत्तर भारताचं कल्याण करते.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार अशी वहात वहात ही पश्चिम बंगालमध्ये शिरते आणि तिला फाटे फुटतात. एक फाटा हुगली (Hooghly) या नावाने कलकत्त्याजवळून वाहतो आणि गंगासागरला बंगालच्या उपसागरात विलीन होतो.


3) ब्रह्मपुत्र :- ( Brahmaputra River )


ब्रह्मपुत्रा हे मात्र जरा विचित्रच प्रकरण आहे!
या नदाचं खरं नाव ब्रह्मपुत्र! म्हणजे ब्रह्माचा पुत्र, मुलगा! सध्या आपण मराठीतला शब्द ब्रह्मपुत्राच म्हणू.
ब्रह्मपुत्रेचा उगम कुठे आहे हेच बराच काळ माहीत नव्हतं! हिमालयाच्या कुठल्यातरी घळीतून अचानक प्रगट होणारी ही नदी खरी कुठे सुरू होते हे कळतंच नव्हतं. नंतर कळालं की ही नदी हिमालयाच्या पलिकडे मानस सरोवराच्या आसपास उगम पावते. तिबेटमधून (म्हणजे चीनमधून) पुढे ती अरुणाचल प्रदेशात भारतात शिरते.
तिबेटमधल्या या पूर्ववाहिनी नदीला यारलुंग त्सांगपो (किंवा नुसतंच त्सांगपो) म्हणतात. अरुणाचलमध्ये दक्षिणवाहिनी झाल्येल्या या नदीला सियांग म्हणायचं. आसाममध्ये पश्चिमवाहिनी झालेल्या या नदीला ब्रह्मपुत्र म्हणायचं. बांग्लादेशात शिरल्यावर तिला जमुना म्हणायचं.


पुढे ही जमुना पद्मा नदीत विलीन होते. आपण त्याला बांग्लादेशातला गंगा-जमुना संगम म्हणू शकतो!
मत्स्यप्रेमी मंडळींसाठी खास माहिती! पद्मा नदी जिथे मेघनेला मिळते त्या परिसरातला हिलसा मासा सगळ्यात चविष्ट. जसा देवगडचा हापूस, तसा चांदपूरचा हिलसा!

तर ही होती मित्रांनो नदी बद्दल महत्त्वाची माहिती जर हे माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की मित्रांसोबत फॅमिलीसोबत शेअर करा.

आणि जर का तुम्हाला वाचायला आवडत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे ते म्हणजे आपण आपल्या वेबसाईट वरती दररोज माहिती पोस्ट करत असतो. सोबतच तुम्हाला मी एक लिंक रेफर करतो जर का तुम्ही त्या लिंक वर ओपन केला तर तुम्हाला जगातल्या बेस्ट सेलर ई-बुक्स बघायला मिळतील तेही अगदी कमी किमतीमध्ये आणि त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल लगेचच लिंक वर जाऊन चेक करा आवडल्यास खरेदी करा.