जीवनाबद्दल 21 क्रूर सत्ये कोणीही मान्य करू इच्छित नाही | 21 Brutal Truths About Life No One Wants to Admit

जीवनाबद्दल 21 क्रूर सत्ये कोणीही मान्य करू इच्छित नाही | 21 Brutal Truths About Life No One Wants to Admit

आपल्या रोजच्या जीवनातील घडणाऱ्या अशा डोळ्यासमोरील गोष्टी जे खूप क्रूर आणि कटू सत्य आहे. ( 21 Brutal Truths About Life No One Wants to Admit ) परंतु लवकर लक्षात येत नाही, तर असेच काहीतरी कटू सत्य आजच्या पोस्टमध्ये सांगणार आहे.


१) सर्वात पहिले क्रूर सत्य – जो खरं बोलतो, लोक त्याला वेडा म्हणतात.

२) तुम्ही कितीही चांगले वागा कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये तुम्ही वाईट असताच. (तुम्ही सर्वांना खूष ठेवू शकत नाही.)

३) कोणीतरी म्हटलं आहे की, ( “ बायकोच्या/प्रेयसीच्या गावातुन फिरताना जरा सांभाळून फिरावे, तिच पहीलं प्रेम तुमच्या आजूबाजूला असु शकते”.)

४) एका अभ्यासानुसार कोणतीच जिवंत व्यक्ती २४ तास पुर्णपणे खुश राहु शकत नाही. पण काही लोक असे आहेत की ते २४ तास दुःखी राहु शकतात.

५) लढाई कुठलीही असो, अगोदर सामान्य माणसालाच बळी जावं लागतं. राजा स्वतः कधीच सुरुवातीला लढत नाही.(राजकारणासो अथवा युद्ध)

६) काहीजण म्हणतात पैशाने सर्व काही खरेदी करता येत नाही परंतु आजच्या काळामध्ये पैशाने सर्व गोष्टी खरेदी करता येतात.

७) आजकाल व्हर्जिन या शब्दाचा खुपच वापर वाढला आहे. “माझा जोडीदार व्हर्जिन असो किंवा नसो मला काहीच फरक पडत नाही, व्हर्जिन असणे किंवा नसणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे”, असं म्हणणारे ८०% लोक(पुरुष/स्त्री) स्वतः व्हर्जिन नसतात.

८) जे लोक आयुष्यात खुप जास्त वेळेला हरलेले असतात, ते आयुष्यात खुप मोठ्ठे होतात नाहीतर आत्महत्या करतात.

९) आजच्या काळात सेक्युरीटी (सुरक्षितता) ही गोष्ट फक्त दिखावा करण्यासाठी अस्तित्वात आहे, अगदी लोकशाही सारखीच.

१०) कर्म खुप भयंकर गोष्ट आहे. तुम्ही दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर शंभर टक्के चान्सेस आहेत की त्यामध्ये तुम्हीच पडाल.

११) माणसापेक्षा निसर्ग खुप बलवान आहे. निसर्गाने ठरवलं तर निसर्ग खुप जिवितहानी करु शकतो.

१२) लहानपणी पुस्तकात वाचत होतो, ” गर्वाचे घर खाली“. हे सत्य कधीच बदलणार नाही.

१३) इथे प्रत्येकजण स्वतःची एक वेगळीच लढाई लढत असतो. लोक अजूनच त्या लढाईत भर घालतात.

१४) लोक म्हणतात प्रेम एकदाच होतं, असं काही नाही. प्रेम कितीही वेळेला होऊ शकतं.

१५) एकवेळेला वाघावर विश्र्वास ठेवणे चांगले पण माणसावर विश्वास ठेवताना खुप विचार करावा लागतो.

१६) एका पुरुषांनी चीट केला तर त्याला धोका म्हणतात आणि एका महिलेने चेक केले तर त्याला प्रेम म्हणतात.

१७) आपण सर्वच गोष्टी चांगल्याप्रकारे करू शकत नाही, आणि त्यामध्ये वाईट वाटण्यासारखे काहीच नाही.

१८) सोशल मीडिया वरील आनंदी फोटो आणि रोजचे खरे जीवन यात खुप मोठा फरक आहे.

१९) पुढारी तोच होऊ शकतो जो एकदम काटेकोरपणे खोटं बोलतो.

२०) तुमचं आयुष्य हे तुमच्या शिवाय दुसरं कोणीही बदलू शकत नाही.

२१) अटळ कठोर सत्य – हे उत्तर लिहीणारा (मि स्वतः) आणि वाचणारे सर्वजण, आपण कितीही प्रयत्न केले, कितीही पैसे खर्च केले तरी कधी ना कधी मरणार आहोत, कधी ते कोणालाच माहित नाही. (फक्त लवकर मरु नका. 😂).

check out thise link for more best seller ebooks